दव दिसे सखे, डोळ्या तुझ्या, मज आसवांचे दव,
कसे सांगु, किती देती, माझ्या अंतरी ते घाव…
कळे मला सोनु, मी तुझा अपराधी अनंत,
धावतो सदा काट्यावर, ना क्षणाची ग उसंत…

रात चांदण्यांची, मनी तुझ्या, येते आणि जाते,
फुललेली बकुळ ती, तुझ्या उशाशी ग राहते..
उरलो मी आता फक्त, स्वप्नांच्या पाकळ्यात,
तरी शोधतेस मला, खिडकीतुंनी सावल्यात…

कसे सांगु तुला आता, मला सुटेना ग हे कोडं,
जपतो मनी तुला, जसा तळ हाताचा ग फोड…
पण पाश माझ्या भोवतीचे, मज सोडवता न येई,
दव तुझ्या डोळ्यातलं, पाहाटे सुकुन ग जाई…

अमृता माणगांवकर

Add some more to my collection… need them!

खोचक, भोचक, ढाणक, खवट, खाट, नालायक, हलकट, नीच, निर्लज्ज, डांबरट, भंपक, कडु, बेअकली, बिनडोक, मुर्ख,

माजोरडा, गाढव, चोमडा, आचरट, आगाव, आर्ष (आज्जी स्पेशल), वात्रट, रिकामा सुतार, चालु, ईरसाल, ईदर कल्याणी,

शेंबडा, बावळट, भंगार, मंद, उद्दाम, किडका, रासवट, चावट, हावरा, येडा, बेणं, बंडल्या, डुक्कर, हारामखोर, काळ्या,

खोटारडा, रेडा, रानटी, रानरेडा, म्हसोबा, नमुना, नग, फुकट्या, टिटवी, टिवटिव, तात्रुटा, घोडा, लाळघोट्या, चेंगट,

पावटा, लुब्रा, टारगट, टोणगा, पोपट्या, चपट्या, गांडुळ, चकणा, भोट, बेसुरा, रड्या, टवळी, भुसनाळ्या, भुक्कड,

चिवट, भांडकुदळ, भांडखोर, चेचवड, अक्कलशुन्य, अक्कलेचा कांदा, मुर्खानाम शिरोमणी, गावठी, आडगा, आडणी,

व्यवहारशुन्य, मोडका, डोंगळा, कंजुष, कद्रु, चिवळ्या, रोगट, कार्टा/ कार्टी, वळु, शिंचा, चिंधीचोर, बोकड, माकड, फालतु,

फलाणा, कजाग, राक्षसी…

आणि काही सभ्य शिव्या आठवत आसतील तर अ‍ॅड कराल नक्की!

 मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात? आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।। बहिणाबाई….

आता आसं सगळं बड्बडण्यासाठी, कविता म्हणण्यासाठी, कोणी मिळत नाही… इकडं मग तिकडंची आठ्वण आल्याशिवाय राहात नाही…

काय सांगयला बसले, आणि काय सांगत आहे… हा हा!

सांगयचं होतं पाखराबद्दल…

साडे सातची बस… शेवटची म्हणुन महत्वाची…
थकुन भागुन, पण काहीतरी साध्य केल्याच्या आंनदानं निवांत… शेवट्ची ओळ…
खिडकीतनं येणारा हलका गार वारा… पिवळा उजेड… confined placce… त्यात गर्दी करुन बसलेली माणसं…
सगळं कसं मनासारखं…

“आरे न्हाय घेतल्या टाळ्या त्या लाईनला तर बघ… @%%#$%”

कुठुन आला बरं आवाज… पहिल्या रांगेतनं? हो… नाटकाच्या स्पर्धा आहेत नाही का?!
कोण बरं हा प्राणी… पुर्ण ९० डीग्री वळुन बोलत आहे…
बस मध्यल्या पॅसेजमध्ये, पाय पसरुन, पिवळ्या प्रकाश गप्पा चाललेल्या आहेत… एकदम कच्कावुन शिव्या देत…

किती छान दिसत आहे… विस्कट्लेले केस… स्ट्रेट आडवे खांदे… नाकावर तोल सावरत बसलेला, वाकडा-तिकडा झालेला चष्मा…
मध्येच मान थोडी वाकवुन तिरकी करण्याची लकब…

What would you say, if I try to run my fingers through those deshelved hair of yours…
OMG… I am not thinking this!!!

काय वय आसेल या प्राण्याचं… ४०+ हम्म्म असेल!
किती निरागस हसु आहे… 
कसा मजेत आहे प्राणी… “जगतोय”
मला असं बनायचं आहे…

Ok… now stop the nonsense… nothing is better than nonsense!!

का पण…
मी एजॉय करत आहे… फुलपाखरु… निळं निळं… भिरभिरतं

“सालं… उगाच थ्री बिएचके घेतला रे… आख्खा आयुष्य एका खोलीत काढलं आहे… फार मोठा वाटतं हे घर मला… काही काही वेळातर एका दिवसात सगळ्या खोल्यात जात पण नाही…”

ही ही मला हा प्राणी जाम आवडला… जाम!
उधळुन टाकलेला गुलाल जसा, वार्यावर तरंगणारा…
बसमध्ये बसण्याच्या जस्ट आधी, स्प्रिंकलर मधुन उडणारे तुषार जसे…

हरवणे, माझा छंद…
रमणे म्हणा हवंतर,
माझं लहानपण त्यातच गेलं, ह्या परी कथेमधुन त्या परी कथेमध्ये हरवण्यात.
सध्या आशी लोकं आयुष्यात आहेत की जी कधीच हरवत नाहीत, किंवा सगळावेळ दक्षतेनं राहतात की “हरवायाचं नाही”
I hope u understand…
अब्स्ट्राक्ट वाटण्याची शक्यता नाकरता येणार नाही, पण हे आसच आणि आगदी खरं आहे…
मग मी प्रयत्न करत आहे… नाही हरवायचं…. पण आपण हारवतोच.
थकणे हा प्रकार माझा जनरली फार लवकर होतो. मग आति कष्टाळु, जिद्दी, विचारी, कामाला वाहुन घेतेलेली लोकं बघितली की अ‍ॅटोमॅटीक स्वत:चा वैताग वैगेरे येतो. त्यांची चिकाटी, dedication, determination बघुनच मला दमायला होतं. माझी आई आशी आहे. पण तिचा हा सदगुण, तिच्या एका पोरानंही घेतला आसेल तर शप्पत!
कामासाठी आपण नसुन, आपल्या साठी काम आहे… आजवर माझी ही definition होती. आता ती बदलावी लगते की काय आसा प्रश्न आहे. निकराचा लढा चालु आहे स्वत:बरोबर. तसा तो नेहमीच चालु आसतो, पण ह्यावेळी मीच मझ्या बाजुने नाही आहे, आसं काहीतरी वाटत आहे.
अभ्यास मी पण केला आहे, चिकाटीनं, मानेचा काटा ढिला होई पर्यंत, पण office चं काम पण तितक्याच निष्ठेनं केल्याचं काही स्मरत नाही, काम करत नाही आसं नाही, जीव ओतुन, पण रोज नाही, हो! तसा अभ्यासही कुठे रोज करायचो?
मी आज आठ तास काम केलं असं कधी न चाचरता, अभिमानानं मग का म्हणता येत नाही, तर ह्या लोकांचं  dedication पाहिलं की आपण करतो ते कामच का? आसं वाटायला लागतं, न्युनगंड येतो.
पुर्वी आसे लोक नव्हते का आजुबाजुला? होते….. होते, पण ते इतके influential नव्हते. One more adaptation… going towards… one more new me. पण आसं किती दूर जाणार आहे मी? थकवा येतो आहे तो त्याचा… स्वत:पासुन दूर जाण्याचा… भिती वाटते ती ह्याची की लोकांकडुन चांगल्या-वाईट गोष्टी घेता घेता कधीतरी ओरिजिनल आपला काही अंशच राहणार नाही आपल्यात…
ओरिजिनल “मी” हेच जर मिथ्या मानलं तर मग गोष्टच वेगळी!

 

From a Hardheaded Friend

Where do I stand,
where do I go?
Lost in time and
froze in space…
from here…
all seems so far away…
where do I go?

I am all alone,
far beyond the sun somewhere.
all you have gone…
far from my heart,
beyond my reach.
I cry out your names…
what else I can do?

I am my tears,
all deep, dark fears…
but I wait for you guys,
I wish you were here.
I breath in the hope,
why else am I alive?

hate me, its ok…
I may not be in your hearts,
at least somewhere I exist…
Someday in someway,
when I am long gone,
Will you be able to find,
Where was I? 

 

आपण जाम विसराळु प्राणी आहोत….
काय त्यात… आपल्याला नाय लाज वाटत कबुल करायला!
आपण, कुठेपण, कायपण, कितीवेळापण विसरु शकतो! ते गायकीची घराणी आसतात ना, तसे आपण दोन्ही घराण्यांकडुन विसराळु आहोत, त्यामुळे एक अब्सोल्युट विसराळुपणा रक्तात आला आहे. 

सांगायच्च झाला तर एक मॅटरनल साईडचा हा किस्सा! 

आमचा मामा, आज्जीला (आईची आई) घेवुन पंढरपूरहून गोंदावल्याला गेला…. येताना तो तिला विसरला! गाडीवर बसायला पुरेसा वेळ न मिळाल्याने आज्जी तिथेच आणि हा निघाला.
वाटेत त्याला वाटलं आज्जी मागेच बसली आहे. म्हणुन तो तिच्याशी बोलु लागला.
आजुबाजुचे जाणारे आपल्याकडे मॅड सारखे का पहातायत हे त्याला कळेना.
म्हणुन तो एकेठिकाणी थांबला, आणि म्हणला, “आई, उतर.”
हि हा हा हा!
मग त्याला कळालं आपली आई तिथे नाहीच, त्याला वाटलं, कुठेतरी रस्त्यात पडली बहुदा आपली आई, तो काळजीने तसाच उलट दिशेने निघाला, वाटेत लोकांना विचारत….
करता करता पुन्हा देवळात पोहोचला!
आज्जी निवांत एका खांबाला टेकुन माळ ओढत बसली होती!
:)

पॅटरनल साईडला आपले आजोबापण भरपुर विसराळु होते!

आजोबा लायब्रारीमध्ये कित्येकवेळा लुना घेवुन जात, मग येताना चालत वापस येत!
मग लुना घ्यायला पुन्हा एकदा जात.

तर असा सगळा इतिहास आसल्याने आपण काय काय आणि कुठे कुठे विसरलो याच्या असंख्य सुरस आणि चमत्करीक कथा पावलो पावली आहेत.
मग आजी कितीही काहीही म्हणो… मला माझ्या विसराळुणाबद्दल. 
आपला विसराळुणा हा…
Pass down from generations, too far back to trace,
I can see all my relations, when I look into my face! :) आहे!
म्हणुन तो मला आपलासा वाटतो!

एकज्याक्टली कुठुन सुरु करु कळत नाहीये… म्हणुन जिथुन हे सगळं click झालं त्या ट्रीगरला सुरु करु…
आपण आसे उभे आहोत… (आपण हे स्वत: साठी वापरायाचे आदरार्थी संबोधन आहे.)
एक error  डोक्यात फिरत आहे, त्यामुळे आजुबाजुची जाण थोडी कमी झाली आहे… का बरं, कशी बरं, तिचं प्रयोजन काय? हे एररचे विचार चालु आहेत.
असं झाला की आपल्याला कमी ऐकायला येता, जसं काय कानात तेल घातलं आहे… [नमन झालं... तेल सपंलं... आता पुढं...]
१: “तिचा फोटो काढ…” [आपणा बद्दल...]
आपण : “का?”
१: “हा ना, पोझ देवुन उभा राहीली आहेस ना…”
[मोमेन्ट ऑफ रिअलायझेशन... आपण भगवान श्रीक्रुष्णांच्या पोझ मध्ये आहोत! ]
आपण : “ओह… “
२: [तिने आपली बाजु घ्यावी आस आपण तिच्यासाठी काहीही केलेले नसताना...] जावु दे रे ती बिचारी…
१: बिचारी? असं बिचारं वैगेरे कोणी नसतं जगात…
[आपण मनात... true... very true!!!]

डोक्यात शब्द घुमला, मंदीर्याच्या गाभर्यात घुमतो तसा, बिचारी…

आपण काही बिचारे वैगेरे नाही आहोत… म्हणजे नसतो अक्चुली! पण कधी कधी लोकांनी तसं म्हणलं तर आपल्याला बरं वाटतं… ह्यावर दुमत आसु शकतं… कारण मला बिचारी, बावळट, फार पुढं जायचं म्हणलं तर काही mild शिव्यापण बोचत नाहीत… ते शब्द, बॉलबेरींग सरखे घरंगळतात मनाच्या भिंतीवरुन… रबरी बॉलसारखे आदळत नाहीत…
शब्द! खुप सारे शब्द, मिनिंग काहीही आसो, त्यांची खिंडारं पाडण्याची ताकत, मन ठरवतं, त्याची उब देण्याची ताकत ही तेच ठरवतं… तसं ते कोण, कधी, कुठल्या टोन मध्ये म्हणतंय यावरुन पण ठरतं… पण काही शब्द कधीही कोणीही म्हणले तर ते लागतात… काहीसं ऑबजेक्टव आसतं त्याच्यामध्ये…

जसं की “मुर्ख”
(कोण बनवला हा शब्द, का बनवला हा शब्द…)
त्याच्या उच्चारातच किती ताकत आहे!
कोणीतरी खाडकन कानाखाली वाजवल्या सारखं वाटतं…
कितीही माईल्ड उच्चारा,  I still feel, getting slapped across the face. (माझी बहीण हा शब्द absolute pricision ने उच्चारते…)

शब्द, असेच, रंगांसारखे, अंनत छटा… अर्थ हे एक  perception आहे… तो सबजेक्टीव आसतो…
समोरच्याने तो शब्द कसा interpret केला, मग त्याप्रमाणे समोरच्याची रिअ‍ॅक्शन येते…
इथे classic physics  कोसळतं आणि theory of relativity उभी राहते…

काही शब्द आपले लाडके आसतात, मला आसं वाटतं, कधी त्याचा “नाद” [हे घंटानादच्या मधलं नाद आहे किंवा आपण rhythm म्हणु!] आपल्याला आवडतो, कधी त्याची absolute authenticity, objectivity आवडते म्हणुन, कधी एक सोशल इमपॅक्ट म्हणुन, आपल्या stack मध्ये ते सारखे आसतात. Static आसतात.
जसं की, प्रचंड, हा शब्द आपल्याला इतका प्रचंड आवडतो, की कोणे एके काळी आपण प्रचंड म्हणुन संबोधलो जायचो.
तसंच भंगार, टुकार… त्या शब्दांना स्वत:चा असा एक नाद आहे…
आवरा, आशक्य हे सोशल इमपॅक्ट ने आलेले, पण ते मग सोशलीच वापरले जातात, विचार त्याच्यातुन होत नाहीत.
पुण्यात आल्यावर मी पहीला नविन शब्द शिकला तो म्हणजे… “गंडलय”… तो वरच्या दोन्ही मध्ये इनक्लुड आहे…
पण मला “बळच” हा शब्द आजिबात आवडत नाही, काय महिती, तो म्हणलाकी मला शेवाळं आठवतं [हे वाक्य अत्यंतिक टुकार आहे पण ते तसंच आहे.]
तसं “कल्पना” हा शब्द मला त्याच्या absolute authenticity, objectivity साठी आवडतो.
तो जसाच्या तसा आसतो, कुठेही वापरा, translated version Idea सुध्धा तसाचं
“आपल्याला काही कल्पना नाही बुवा!” or I have no idea! It means what it means!
“चालायचंच” आणखी हा एक. [सोशल + authentic]

अम्हाला एक कविता होती, ॠणाईत नावाची… शब्दांसाठी लिहलेली कविता!
[जशी आठवती आहे, तशी लिहली आहे... चुकभुल देणे घेणे!]

स्वत:वरचा, जगावरचा, विश्वास जेव्हा उडुन जातो,
माऊलीची कुस बनुन, शब्दच मला जवळ घेतात,
लाजीरवाणे आसे जिणे, आपमानाचे ओढत जातो,
प्राण चुंबुन घुसमटलेले, शब्द सखेच धीर देतात.

अंधारुन येतात दिशा, चार भिंती एक छप्पर,
काळोखात बुडुन जाते, झाडे खातात मुकाट मार,
चिकचिक माती, रपरप पाय, ठणकणारी जखम जशी,
असे होते मन आणि, शब्दच होतात सहप्रवाशी.

प्रवासाच्या आरंभाला वळणवेड्या मार्गातुन मरण येतं,
कवेत घेवुन माझ्या आधी, शब्दच त्याचं स्वागत करतात,
ॠणाईत मी शब्दांना सर्वस्वाने ओलीस जातो,
प्रारब्धाच्या प्रकाशधारांत ॠणाईत गाणे गातो.

भरपुर बोर केलं बास आता! ;)

१:  हेलो, गुड मॉरनिंग, काय म्हणतोस काका?
२: हेलॊ, बोला काय म्हणताय!
१: सॉरी आरे, मला तुला दसर्याला फोन करायला नाही झाला… सगळी गडबड, गडबड चालु होती…
२: हंम्म…. विसरा आता तुम्ही अम्हाला… आता काय लग्न झाल्यावर, तुमच्याकडे आमच्या साठी कुठला वेळ आला आहे…
चालायचच…
१: तसं नाही रे काका…
२: आली पण नाहीस इकडे..
१: येईन येईन :)

………………………………………..

१: हेलॊ आत्या, गुड मॉरनिंग…
३: हेलॊ ताई, गुड मॉरनिंग, कशी आहेस?
१: मी छान, तु कशी आहेस? सॉरी ग, मला दसर्याला फोन करायला नाही झाला… गडबड चालु होती…
३: अग ठीक आहे, ताई, तुला फोन करायला नाही झाला, तसा मलाही तुला करायला जमलं नाही…
१: नाही ग… आत्या तुला उगाच वाटेल, विसरली की काय!
३: अग अम्हाला यात आनंदच आहे… पोरगी आता तिकडं इतकी रमली की तिला सारखी माहेरची आठवण येत नाही…  आता स्वत:च सगळं स्वत: बघती आहे! एखाद्या दिवशी एकडं येवून जा… विश्रांतीला. मी तुझ्यासाठी मस्त बेत करुन ठेवेन… मग तुळशी बागेत जावु दोघी मिळुन.
१: नक्की नक्की

हट्ट तुझ्या जवळ आसण्याचा नाही,
प्रश्न तुझ्या नसण्याचाही नाही,
का तुला समलंच कधी नाही,
राग माझा तुझ्या वरती नाही. 

हट्ट तु फोन करावास म्हणुन नाही,
प्रश्न, मीच का करु आसाही नाही,
आठवण मला तुझी येते, तुला नाही,
हा काही तुझा दोष नक्कीच नाही


A Wound!

 

Deep is the cut
and open is my wound,
blood drips silently,
there no sound.

Pillow holds my tears,
as mutely I wept,
looking pale in the dawn,
as whole night I havent slept.

Frozen are my senses,
can’t feel a thing,
not every song will be sweet,
that life will sing.

Trying to fix,
my once broken heart,
getting wounded,
while picking bits and parts
 
Then they ask me,
“Whats your story?”
I fake a smile,
Cause truth is too scary!

~0~

Next Page »

Follow

Get every new post delivered to your Inbox.