आपण जाम विसराळु प्राणी आहोत….
काय त्यात… आपल्याला नाय लाज वाटत कबुल करायला!
आपण, कुठेपण, कायपण, कितीवेळापण विसरु शकतो! ते गायकीची घराणी आसतात ना, तसे आपण दोन्ही घराण्यांकडुन विसराळु आहोत, त्यामुळे एक अब्सोल्युट विसराळुपणा रक्तात आला आहे.
सांगायच्च झाला तर एक मॅटरनल साईडचा हा किस्सा!
आमचा मामा, आज्जीला (आईची आई) घेवुन पंढरपूरहून गोंदावल्याला गेला…. येताना तो तिला विसरला! गाडीवर बसायला पुरेसा वेळ न मिळाल्याने आज्जी तिथेच आणि हा निघाला.
वाटेत त्याला वाटलं आज्जी मागेच बसली आहे. म्हणुन तो तिच्याशी बोलु लागला.
आजुबाजुचे जाणारे आपल्याकडे मॅड सारखे का पहातायत हे त्याला कळेना.
म्हणुन तो एकेठिकाणी थांबला, आणि म्हणला, “आई, उतर.”
हि हा हा हा!
मग त्याला कळालं आपली आई तिथे नाहीच, त्याला वाटलं, कुठेतरी रस्त्यात पडली बहुदा आपली आई, तो काळजीने तसाच उलट दिशेने निघाला, वाटेत लोकांना विचारत….
करता करता पुन्हा देवळात पोहोचला!
आज्जी निवांत एका खांबाला टेकुन माळ ओढत बसली होती!
पॅटरनल साईडला आपले आजोबापण भरपुर विसराळु होते!
आजोबा लायब्रारीमध्ये कित्येकवेळा लुना घेवुन जात, मग येताना चालत वापस येत!
मग लुना घ्यायला पुन्हा एकदा जात.
तर असा सगळा इतिहास आसल्याने आपण काय काय आणि कुठे कुठे विसरलो याच्या असंख्य सुरस आणि चमत्करीक कथा पावलो पावली आहेत.
मग आजी कितीही काहीही म्हणो… मला माझ्या विसराळुणाबद्दल.
आपला विसराळुणा हा…
Pass down from generations, too far back to trace,
I can see all my relations, when I look into my face!
आहे!
म्हणुन तो मला आपलासा वाटतो!
December 27, 2010 at 4:13 pm
मजेशी आहेत किस्से. तुमचे किस्से लिहा जरूर.
December 28, 2010 at 6:04 am
कालच comment टाकणार होतो पण विसरलो…विसराळु पोस्टला comment टाकायचे विसरलो.
एकदम भारी कथाकथन …वाटते लेखक एक एक गोष्ट समजवून सांगत आहे.
आज सकाळीच ठरवून आलो होतो की विसरायच्या आत comment पोस्ट करा.
December 30, 2010 at 7:34 am
Aata tuze kahi kisse houn jau det…ka tey pan saaf visarli aahes ?
January 8, 2011 at 2:27 pm
mast lihala aahes…
) divas athavale…
mala sagde june(old