मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात? आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।। बहिणाबाई….
आता आसं सगळं बड्बडण्यासाठी, कविता म्हणण्यासाठी, कोणी मिळत नाही… इकडं मग तिकडंची आठ्वण आल्याशिवाय राहात नाही…
काय सांगयला बसले, आणि काय सांगत आहे… हा हा!
सांगयचं होतं पाखराबद्दल…
साडे सातची बस… शेवटची म्हणुन महत्वाची…
थकुन भागुन, पण काहीतरी साध्य केल्याच्या आंनदानं निवांत… शेवट्ची ओळ…
खिडकीतनं येणारा हलका गार वारा… पिवळा उजेड… confined placce… त्यात गर्दी करुन बसलेली माणसं…
सगळं कसं मनासारखं…
“आरे न्हाय घेतल्या टाळ्या त्या लाईनला तर बघ… @%%#$%”
कुठुन आला बरं आवाज… पहिल्या रांगेतनं? हो… नाटकाच्या स्पर्धा आहेत नाही का?!
कोण बरं हा प्राणी… पुर्ण ९० डीग्री वळुन बोलत आहे…
बस मध्यल्या पॅसेजमध्ये, पाय पसरुन, पिवळ्या प्रकाश गप्पा चाललेल्या आहेत… एकदम कच्कावुन शिव्या देत…
किती छान दिसत आहे… विस्कट्लेले केस… स्ट्रेट आडवे खांदे… नाकावर तोल सावरत बसलेला, वाकडा-तिकडा झालेला चष्मा…
मध्येच मान थोडी वाकवुन तिरकी करण्याची लकब…
What would you say, if I try to run my fingers through those deshelved hair of yours…
OMG… I am not thinking this!!!
काय वय आसेल या प्राण्याचं… ४०+ हम्म्म असेल!
किती निरागस हसु आहे…
कसा मजेत आहे प्राणी… “जगतोय”
मला असं बनायचं आहे…
Ok… now stop the nonsense… nothing is better than nonsense!!
का पण…
मी एजॉय करत आहे… फुलपाखरु… निळं निळं… भिरभिरतं
“सालं… उगाच थ्री बिएचके घेतला रे… आख्खा आयुष्य एका खोलीत काढलं आहे… फार मोठा वाटतं हे घर मला… काही काही वेळातर एका दिवसात सगळ्या खोल्यात जात पण नाही…”
ही ही मला हा प्राणी जाम आवडला… जाम!
उधळुन टाकलेला गुलाल जसा, वार्यावर तरंगणारा…
बसमध्ये बसण्याच्या जस्ट आधी, स्प्रिंकलर मधुन उडणारे तुषार जसे…
April 20, 2011 at 4:09 am
ह्म्म पिल्लू, मला आवडलं तुझं लिहिणं. विशेषतः “आता आसं सगळं बड्बडण्यासाठी, कविता म्हणण्यासाठी, कोणी मिळत नाही… इकडं मग तिकडंची आठ्वण आल्याशिवाय राहात नाही…”
बरंच काही सांगितलं असतं रे पिल्लू, पण हे नाव घेऊन बसलोय ना, त्या नावानं इतकंही लिहिलं तेच खूप झालं.
April 20, 2011 at 4:39 am
मस्त आहे पोस्ट आवडली
April 20, 2011 at 10:47 am
“Run my fingers…”
Soooooo sweet ! I so understand what you felt at that moment ! Lovely post…very floaty-dreamy-romantic feel to it
Keep writing.