February 2009


आपण काय बोलतो आणि दुसरा काय ऐकतो याचा एकमेंकाशी काही संबंध नसुही शकतो.  जसं माझा TL जे बोलतो आणि मी जे ऐकते, किंवा कधी कधी मी जे बोलते आणि तो जे ऐकतो त्या दोन गोष्टींचा काही सुतराम संबंध नसतो.  I can prove this with following examples.

उदाहरणार्थ,

जेवून आपण पेंगत आसताना, कधी, कधी स्वगतही गावाला ऐकू जातील आश्या स्वरात बोलतो… आशीच दुपारच्या पेंगू वेळी 

मी : (आ‍ऽऽऽऽ[जांभई])  बारीक, बारीक भात खाल्ल्यामुळे  बहुतेक सुस्ती आली आहे…

हेमंत(Our Team Leader):  बारीक बारीक कसा खाशील, थोडा भात खाणार…

मी: (मी डोळे सुपारी एवढे मोठे करत…) काय?

हेमंत:  थोडा भात खाणार ना…

मी: oh…

हेमंत: तु काय ऐकलं?

मी: काय नाय…

आता सांगा आपण काय ऐकलं? ‘थोबाडात खाणार…’

तर हे आसं आहे.

 

 

आता दुसरा प्रूफ़,

हेमंत: तो फ़ोर्म कुठून ओपन होतो बरं…

मी: सेवच्या क्लिकवर…

हेमंत: काय? [Now he was in same condition as I was in earlier example.]

मी: सेवच्या क्लिकवर रे!

हेमंत: तु काय म्हणत आहेस?

मी: फ़ोर्म सेव बटणाच्या क्लिकवर ओपन होतो.

हेमंत: आसं होय.

मी: तु काय ऐकलं?

आता सांगा त्याने काय ऐकलं असेल? “शेव चकली चोर”  🙂

आसं एक आठ दिवसात एखादवेळा तरी घडतंच, म्हणून म्हणलं, आपण काय बोलतो आणि दुसरा काय ऐकतो याचा एकमेंकाशी काही संबंध नसुही शकतो. Interpretation ही तर आणखीनच वेगळी गोष्ट आहे!

आम्ही दोघी सकाळी लेट(आठ नंतर) उठतो. सगळ्या होस्टेलची आघोंळ झाल्यावर निवांत आघोळीला जातो. आमच्या बादल्या कधिच रांगेत दिसत नाहित.

आम्ही दोघी ओफ़ीसला, ओफ़ीस टाईमच्या एक नाहीतर दोन मिनिटे आधी पोहोचतो.  म्हणजे जर १०:०० नंतर लेट मार्क लागतो तर आम्ही ९:५८, ९:५५, ९:५९ आसे पोहचतो,  आणि ९:३० नंतर लेट मार्क लागत आसेल तर, ९:२८, ९:२७, ९:३०.  गेट पासून पळत जातो… त्यावेळी मस्टरवाले शिपाईमामा हसत म्हणतात, “मेडम, मेडम लवकर, वाजलं साडे नव ”   🙂

आम्ही दोघीही, स्वताच्या मोबाईलवर बडबडत, तो एका कानाला लावून, तिरकी मान करून, रूमचे  कुलुप उघडून, रूममध्ये स्वताचाच मोबाईल  विसरला कि काय म्हणून शोधू शकतो (“नशीब न विसरता व्यवस्थीत होस्टेलवरच परत येता!” आसे टोमणे काही कुजकट लोक मारू शकतात.).

सकाळी मिटींगसाठी लवकर निघायचे आहे, किंवा गाडी पकडायची आहे हे माहित आसून देखील रात्री “Notting Hill” २५ व्यावेळा बघू शकतो किंवा ‘Wednesday’ बघाचा राहून जाईल म्हणून, तो बघून मग त्यावर प्रदीर्घ चर्चा करू शकतो. आणि मग सकाळी गाडी पुणे स्टेशनला नाही भेटली (म्हणजे आपल्याला लेट झाल्यामुळे सोडून गेली) कि तिचा रिक्शाने पाठलाग करत, कधी येरवडा, कधी नगर हायवेवरून पकडतो.

ओफ़िस मध्ये मिटींग चालू आसताना पुश बेक चेअरचा आवाज काढून लोकांना डिसटर्ब करणे हा तर रोजचाच खेळ आहे. आणि त्यानंतर TL, PL च्या चेहर्याचे रसभरीत वर्णन एकमेकाला होस्टेलवर येवून सांगतो. अप्रतिम आनंद.

Together. Its above all concept.

माझीया जातीचे मिळोत मज… I understood this line now.

And now that she is leaving….my friend, philosopher and guide. I am gonna miss her. You know something the kind of understanding and co-ordination two ‘Lazy people'[That is how others generally missunderstand. We are not careless. We are just little different from others. We are cheerfully irresponsible] has is always exceptional. I think we both have that.

“And now that you are gone,
just wanna be with you,
and I can’t go on,
I wanna be with you…”

काय काय म्हणून सांगु,

आजोबा

दिवसभर पु. लं. च्या नारायणा सारखं पळून झाल्यावर,  मी एक कोपर्यातली खुर्ची पकडून, Mortein RAT KILL खालेल्या उंदराप्रमाणे उघड्याडोळ्यांनी झोपले होते.

एक आजोबा : (मी एका कुठल्या तरी हातावर[माझ्याच] एक टाटू लावला होता, त्याकडे बोट करत) हे एकाच बाजूला काय चिकटवलं आहेस ते रंगीबेरंगी?

मी : ते टाटू आहे [आता काय सांगू].

आजोबा : आसं होय, मग ते एकाच बाजूला का लावलय?

मी : [अशक्य कंटाळून] दुसर्या बाजूचं पडलं कुठेतरी.

आजोबा : मग ते तरी शोध, नहीतर हे तरी कढून टाक, एकाच बाजूला ते विचित्र दिसतं!

मी: हं… हो.

आजोबा : मगाशी त्या खुर्चिवर बसलेलीस तिकडे बघून येतेस का? तिकडे आसेल….

मी: हो हो [आरे यार… का? का चावता आहात?]  

आजोबा: मी बघून येवू का?

मी : नको नको… [मला १० मिनिटं शांत बसू देत ना… प्लीज] मी जाईन नंतर!

आजोबा: अगं लहान पोरं उचलतील…. तोंडात घालतील…

मी : [खुर्चिवरून उठत] हं‌ऽऽऽ

आजोबा: येताना माझी काठी त्या खुर्चिकडेला ठेवली[ ‘विसरली’ याला पर्यायी योजना ‘ठेवली’ आशी होते, काय समजलात?] होती, ती घेवून ये.

 

आई

कर्ण कर्कश आवाज… उंहु‍ऽऽऽ आ‌ऽऽऽऽ हं हं हं…..

मी बासुंदीने जडावलेले डोळ्यांचे शटर उघडले…

मी : काय झालं?

आवाज काढणारीची आई: [अत्यंत चिडक्या सुरात] तीला भूक लागलेली आहे…

मी : [यात मज पामराचा काय दोष…. आता हि कन्यका काय खाते कुणाला ठावूक! फ़्यू‍ऽऽऽ] दूध आणयाला पाठवू का कुणला?

आई : [तिच्या दोन आठ्यामध्ये मी अख्खी मावले आस्ते.]  तिला वरण-भात लागतो(एवढं सुध्दा कळत नाही?)…

मुलगी : आ‌ऽऽऽऽ हं हं हं…..

मी : आणते….

आई: तीनं सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये…[ह्या सुराला काय म्हणतात, कर्णकटू, तीक्श्ण, तापलेल्या तेलासारखा?]

मी: [आबे यार… घालायचं होतस ना… बरोबर लहान मूल आहे तर… त्याचं सगळं घेवून नको का यायला?] घेवून येते.

आई : पाच मिनिटात आणा…

मी : [राग आल्यावर मक्ख चेहरा कसा करतात?] बरं…

 

— बाकीचे नंतर सांगेनच! That’s all for the moment.