काय काय म्हणून सांगु,

आजोबा

दिवसभर पु. लं. च्या नारायणा सारखं पळून झाल्यावर,  मी एक कोपर्यातली खुर्ची पकडून, Mortein RAT KILL खालेल्या उंदराप्रमाणे उघड्याडोळ्यांनी झोपले होते.

एक आजोबा : (मी एका कुठल्या तरी हातावर[माझ्याच] एक टाटू लावला होता, त्याकडे बोट करत) हे एकाच बाजूला काय चिकटवलं आहेस ते रंगीबेरंगी?

मी : ते टाटू आहे [आता काय सांगू].

आजोबा : आसं होय, मग ते एकाच बाजूला का लावलय?

मी : [अशक्य कंटाळून] दुसर्या बाजूचं पडलं कुठेतरी.

आजोबा : मग ते तरी शोध, नहीतर हे तरी कढून टाक, एकाच बाजूला ते विचित्र दिसतं!

मी: हं… हो.

आजोबा : मगाशी त्या खुर्चिवर बसलेलीस तिकडे बघून येतेस का? तिकडे आसेल….

मी: हो हो [आरे यार… का? का चावता आहात?]  

आजोबा: मी बघून येवू का?

मी : नको नको… [मला १० मिनिटं शांत बसू देत ना… प्लीज] मी जाईन नंतर!

आजोबा: अगं लहान पोरं उचलतील…. तोंडात घालतील…

मी : [खुर्चिवरून उठत] हं‌ऽऽऽ

आजोबा: येताना माझी काठी त्या खुर्चिकडेला ठेवली[ ‘विसरली’ याला पर्यायी योजना ‘ठेवली’ आशी होते, काय समजलात?] होती, ती घेवून ये.

 

आई

कर्ण कर्कश आवाज… उंहु‍ऽऽऽ आ‌ऽऽऽऽ हं हं हं…..

मी बासुंदीने जडावलेले डोळ्यांचे शटर उघडले…

मी : काय झालं?

आवाज काढणारीची आई: [अत्यंत चिडक्या सुरात] तीला भूक लागलेली आहे…

मी : [यात मज पामराचा काय दोष…. आता हि कन्यका काय खाते कुणाला ठावूक! फ़्यू‍ऽऽऽ] दूध आणयाला पाठवू का कुणला?

आई : [तिच्या दोन आठ्यामध्ये मी अख्खी मावले आस्ते.]  तिला वरण-भात लागतो(एवढं सुध्दा कळत नाही?)…

मुलगी : आ‌ऽऽऽऽ हं हं हं…..

मी : आणते….

आई: तीनं सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये…[ह्या सुराला काय म्हणतात, कर्णकटू, तीक्श्ण, तापलेल्या तेलासारखा?]

मी: [आबे यार… घालायचं होतस ना… बरोबर लहान मूल आहे तर… त्याचं सगळं घेवून नको का यायला?] घेवून येते.

आई : पाच मिनिटात आणा…

मी : [राग आल्यावर मक्ख चेहरा कसा करतात?] बरं…

 

— बाकीचे नंतर सांगेनच! That’s all for the moment.

Advertisements