आपण काय बोलतो आणि दुसरा काय ऐकतो याचा एकमेंकाशी काही संबंध नसुही शकतो.  जसं माझा TL जे बोलतो आणि मी जे ऐकते, किंवा कधी कधी मी जे बोलते आणि तो जे ऐकतो त्या दोन गोष्टींचा काही सुतराम संबंध नसतो.  I can prove this with following examples.

उदाहरणार्थ,

जेवून आपण पेंगत आसताना, कधी, कधी स्वगतही गावाला ऐकू जातील आश्या स्वरात बोलतो… आशीच दुपारच्या पेंगू वेळी 

मी : (आ‍ऽऽऽऽ[जांभई])  बारीक, बारीक भात खाल्ल्यामुळे  बहुतेक सुस्ती आली आहे…

हेमंत(Our Team Leader):  बारीक बारीक कसा खाशील, थोडा भात खाणार…

मी: (मी डोळे सुपारी एवढे मोठे करत…) काय?

हेमंत:  थोडा भात खाणार ना…

मी: oh…

हेमंत: तु काय ऐकलं?

मी: काय नाय…

आता सांगा आपण काय ऐकलं? ‘थोबाडात खाणार…’

तर हे आसं आहे.

 

 

आता दुसरा प्रूफ़,

हेमंत: तो फ़ोर्म कुठून ओपन होतो बरं…

मी: सेवच्या क्लिकवर…

हेमंत: काय? [Now he was in same condition as I was in earlier example.]

मी: सेवच्या क्लिकवर रे!

हेमंत: तु काय म्हणत आहेस?

मी: फ़ोर्म सेव बटणाच्या क्लिकवर ओपन होतो.

हेमंत: आसं होय.

मी: तु काय ऐकलं?

आता सांगा त्याने काय ऐकलं असेल? “शेव चकली चोर”  🙂

आसं एक आठ दिवसात एखादवेळा तरी घडतंच, म्हणून म्हणलं, आपण काय बोलतो आणि दुसरा काय ऐकतो याचा एकमेंकाशी काही संबंध नसुही शकतो. Interpretation ही तर आणखीनच वेगळी गोष्ट आहे!

Advertisements