waiting
~~~0~~~

रुसलेच शब्द सारे, मज सुर आठ्वेना,
वेड्या मनास माझ्या, हा अनुराग सोसवेना.

आश्रुंनीया भिजवली, मी कोरडीच ती प्रिती
जपल्या कळ्या किती अन, काट्यात घेरलेल्या.

वेदना उरीची ही, हे शल्य बोचरे रे,
झाले का उदासवाणे, मी चित्र रेखलेले.

उव्देग उसळतो हा, एक कथा अधुरी मी,
समईस्तव तेवत आहे, ही व्यथा आंतरीची…