हरवणे, माझा छंद…
रमणे म्हणा हवंतर,
माझं लहानपण त्यातच गेलं, ह्या परी कथेमधुन त्या परी कथेमध्ये हरवण्यात.
सध्या आशी लोकं आयुष्यात आहेत की जी कधीच हरवत नाहीत, किंवा सगळावेळ दक्षतेनं राहतात की “हरवायाचं नाही”
I hope u understand…
अब्स्ट्राक्ट वाटण्याची शक्यता नाकरता येणार नाही, पण हे आसच आणि आगदी खरं आहे…
मग मी प्रयत्न करत आहे… नाही हरवायचं…. पण आपण हारवतोच.
थकणे हा प्रकार माझा जनरली फार लवकर होतो. मग आति कष्टाळु, जिद्दी, विचारी, कामाला वाहुन घेतेलेली लोकं बघितली की अ‍ॅटोमॅटीक स्वत:चा वैताग वैगेरे येतो. त्यांची चिकाटी, dedication, determination बघुनच मला दमायला होतं. माझी आई आशी आहे. पण तिचा हा सदगुण, तिच्या एका पोरानंही घेतला आसेल तर शप्पत!
कामासाठी आपण नसुन, आपल्या साठी काम आहे… आजवर माझी ही definition होती. आता ती बदलावी लगते की काय आसा प्रश्न आहे. निकराचा लढा चालु आहे स्वत:बरोबर. तसा तो नेहमीच चालु आसतो, पण ह्यावेळी मीच मझ्या बाजुने नाही आहे, आसं काहीतरी वाटत आहे.
अभ्यास मी पण केला आहे, चिकाटीनं, मानेचा काटा ढिला होई पर्यंत, पण office चं काम पण तितक्याच निष्ठेनं केल्याचं काही स्मरत नाही, काम करत नाही आसं नाही, जीव ओतुन, पण रोज नाही, हो! तसा अभ्यासही कुठे रोज करायचो?
मी आज आठ तास काम केलं असं कधी न चाचरता, अभिमानानं मग का म्हणता येत नाही, तर ह्या लोकांचं  dedication पाहिलं की आपण करतो ते कामच का? आसं वाटायला लागतं, न्युनगंड येतो.
पुर्वी आसे लोक नव्हते का आजुबाजुला? होते….. होते, पण ते इतके influential नव्हते. One more adaptation… going towards… one more new me. पण आसं किती दूर जाणार आहे मी? थकवा येतो आहे तो त्याचा… स्वत:पासुन दूर जाण्याचा… भिती वाटते ती ह्याची की लोकांकडुन चांगल्या-वाईट गोष्टी घेता घेता कधीतरी ओरिजिनल आपला काही अंशच राहणार नाही आपल्यात…
ओरिजिनल “मी” हेच जर मिथ्या मानलं तर मग गोष्टच वेगळी!