badbad


दिसे सखे, डोळ्या तुझ्या, मज आसवांचे दव,
कसे सांगु, किती देती, माझ्या अंतरी ते घाव…
कळे मला सोनु, मी तुझा अपराधी अनंत,
धावतो सदा काट्यावर, ना क्षणाची ग उसंत…

रात चांदण्यांची, मनी तुझ्या, येते आणि जाते,
फुललेली बकुळ ती, तुझ्या उशाशी ग राहते..
उरलो मी आता फक्त, स्वप्नांच्या पाकळ्यात,
तरी शोधतेस मला, खिडकीतुंनी सावल्यात…

कसे सांगु तुला आता, मला सुटेना ग हे कोडं,
जपतो मनी तुला, जसा तळ हाताचा ग फोड…
पण पाश माझ्या भोवतीचे, मज सोडवता न येई,
दव तुझ्या डोळ्यातलं, पाहाटे सुकुन ग जाई…

अमृता माणगांवकर

आपण जाम विसराळु प्राणी आहोत….
काय त्यात… आपल्याला नाय लाज वाटत कबुल करायला!
आपण, कुठेपण, कायपण, कितीवेळापण विसरु शकतो! ते गायकीची घराणी आसतात ना, तसे आपण दोन्ही घराण्यांकडुन विसराळु आहोत, त्यामुळे एक अब्सोल्युट विसराळुपणा रक्तात आला आहे. 

सांगायच्च झाला तर एक मॅटरनल साईडचा हा किस्सा! 

आमचा मामा, आज्जीला (आईची आई) घेवुन पंढरपूरहून गोंदावल्याला गेला…. येताना तो तिला विसरला! गाडीवर बसायला पुरेसा वेळ न मिळाल्याने आज्जी तिथेच आणि हा निघाला.
वाटेत त्याला वाटलं आज्जी मागेच बसली आहे. म्हणुन तो तिच्याशी बोलु लागला.
आजुबाजुचे जाणारे आपल्याकडे मॅड सारखे का पहातायत हे त्याला कळेना.
म्हणुन तो एकेठिकाणी थांबला, आणि म्हणला, “आई, उतर.”
हि हा हा हा!
मग त्याला कळालं आपली आई तिथे नाहीच, त्याला वाटलं, कुठेतरी रस्त्यात पडली बहुदा आपली आई, तो काळजीने तसाच उलट दिशेने निघाला, वाटेत लोकांना विचारत….
करता करता पुन्हा देवळात पोहोचला!
आज्जी निवांत एका खांबाला टेकुन माळ ओढत बसली होती!
🙂

पॅटरनल साईडला आपले आजोबापण भरपुर विसराळु होते!

आजोबा लायब्रारीमध्ये कित्येकवेळा लुना घेवुन जात, मग येताना चालत वापस येत!
मग लुना घ्यायला पुन्हा एकदा जात.

तर असा सगळा इतिहास आसल्याने आपण काय काय आणि कुठे कुठे विसरलो याच्या असंख्य सुरस आणि चमत्करीक कथा पावलो पावली आहेत.
मग आजी कितीही काहीही म्हणो… मला माझ्या विसराळुणाबद्दल. 
आपला विसराळुणा हा…
Pass down from generations, too far back to trace,
I can see all my relations, when I look into my face! 🙂 आहे!
म्हणुन तो मला आपलासा वाटतो!

एकज्याक्टली कुठुन सुरु करु कळत नाहीये… म्हणुन जिथुन हे सगळं click झालं त्या ट्रीगरला सुरु करु…
आपण आसे उभे आहोत… (आपण हे स्वत: साठी वापरायाचे आदरार्थी संबोधन आहे.)
एक error  डोक्यात फिरत आहे, त्यामुळे आजुबाजुची जाण थोडी कमी झाली आहे… का बरं, कशी बरं, तिचं प्रयोजन काय? हे एररचे विचार चालु आहेत.
असं झाला की आपल्याला कमी ऐकायला येता, जसं काय कानात तेल घातलं आहे… [नमन झालं… तेल सपंलं… आता पुढं…]
१: “तिचा फोटो काढ…” [आपणा बद्दल…]
आपण : “का?”
१: “हा ना, पोझ देवुन उभा राहीली आहेस ना…”
[मोमेन्ट ऑफ रिअलायझेशन… आपण भगवान श्रीक्रुष्णांच्या पोझ मध्ये आहोत! ]
आपण : “ओह… ”
२: [तिने आपली बाजु घ्यावी आस आपण तिच्यासाठी काहीही केलेले नसताना…] जावु दे रे ती बिचारी…
१: बिचारी? असं बिचारं वैगेरे कोणी नसतं जगात…
[आपण मनात… true… very true!!!]

डोक्यात शब्द घुमला, मंदीर्याच्या गाभर्यात घुमतो तसा, बिचारी…

आपण काही बिचारे वैगेरे नाही आहोत… म्हणजे नसतो अक्चुली! पण कधी कधी लोकांनी तसं म्हणलं तर आपल्याला बरं वाटतं… ह्यावर दुमत आसु शकतं… कारण मला बिचारी, बावळट, फार पुढं जायचं म्हणलं तर काही mild शिव्यापण बोचत नाहीत… ते शब्द, बॉलबेरींग सरखे घरंगळतात मनाच्या भिंतीवरुन… रबरी बॉलसारखे आदळत नाहीत…
शब्द! खुप सारे शब्द, मिनिंग काहीही आसो, त्यांची खिंडारं पाडण्याची ताकत, मन ठरवतं, त्याची उब देण्याची ताकत ही तेच ठरवतं… तसं ते कोण, कधी, कुठल्या टोन मध्ये म्हणतंय यावरुन पण ठरतं… पण काही शब्द कधीही कोणीही म्हणले तर ते लागतात… काहीसं ऑबजेक्टव आसतं त्याच्यामध्ये…

जसं की “मुर्ख”
(कोण बनवला हा शब्द, का बनवला हा शब्द…)
त्याच्या उच्चारातच किती ताकत आहे!
कोणीतरी खाडकन कानाखाली वाजवल्या सारखं वाटतं…
कितीही माईल्ड उच्चारा,  I still feel, getting slapped across the face. (माझी बहीण हा शब्द absolute pricision ने उच्चारते…)

शब्द, असेच, रंगांसारखे, अंनत छटा… अर्थ हे एक  perception आहे… तो सबजेक्टीव आसतो…
समोरच्याने तो शब्द कसा interpret केला, मग त्याप्रमाणे समोरच्याची रिअ‍ॅक्शन येते…
इथे classic physics  कोसळतं आणि theory of relativity उभी राहते…

काही शब्द आपले लाडके आसतात, मला आसं वाटतं, कधी त्याचा “नाद” [हे घंटानादच्या मधलं नाद आहे किंवा आपण rhythm म्हणु!] आपल्याला आवडतो, कधी त्याची absolute authenticity, objectivity आवडते म्हणुन, कधी एक सोशल इमपॅक्ट म्हणुन, आपल्या stack मध्ये ते सारखे आसतात. Static आसतात.
जसं की, प्रचंड, हा शब्द आपल्याला इतका प्रचंड आवडतो, की कोणे एके काळी आपण प्रचंड म्हणुन संबोधलो जायचो.
तसंच भंगार, टुकार… त्या शब्दांना स्वत:चा असा एक नाद आहे…
आवरा, आशक्य हे सोशल इमपॅक्ट ने आलेले, पण ते मग सोशलीच वापरले जातात, विचार त्याच्यातुन होत नाहीत.
पुण्यात आल्यावर मी पहीला नविन शब्द शिकला तो म्हणजे… “गंडलय”… तो वरच्या दोन्ही मध्ये इनक्लुड आहे…
पण मला “बळच” हा शब्द आजिबात आवडत नाही, काय महिती, तो म्हणलाकी मला शेवाळं आठवतं [हे वाक्य अत्यंतिक टुकार आहे पण ते तसंच आहे.]
तसं “कल्पना” हा शब्द मला त्याच्या absolute authenticity, objectivity साठी आवडतो.
तो जसाच्या तसा आसतो, कुठेही वापरा, translated version Idea सुध्धा तसाचं
“आपल्याला काही कल्पना नाही बुवा!” or I have no idea! It means what it means!
“चालायचंच” आणखी हा एक. [सोशल + authentic]

अम्हाला एक कविता होती, ॠणाईत नावाची… शब्दांसाठी लिहलेली कविता!
[जशी आठवती आहे, तशी लिहली आहे… चुकभुल देणे घेणे!]

स्वत:वरचा, जगावरचा, विश्वास जेव्हा उडुन जातो,
माऊलीची कुस बनुन, शब्दच मला जवळ घेतात,
लाजीरवाणे आसे जिणे, आपमानाचे ओढत जातो,
प्राण चुंबुन घुसमटलेले, शब्द सखेच धीर देतात.

अंधारुन येतात दिशा, चार भिंती एक छप्पर,
काळोखात बुडुन जाते, झाडे खातात मुकाट मार,
चिकचिक माती, रपरप पाय, ठणकणारी जखम जशी,
असे होते मन आणि, शब्दच होतात सहप्रवाशी.

प्रवासाच्या आरंभाला वळणवेड्या मार्गातुन मरण येतं,
कवेत घेवुन माझ्या आधी, शब्दच त्याचं स्वागत करतात,
ॠणाईत मी शब्दांना सर्वस्वाने ओलीस जातो,
प्रारब्धाच्या प्रकाशधारांत ॠणाईत गाणे गातो.

भरपुर बोर केलं बास आता! 😉

१:  हेलो, गुड मॉरनिंग, काय म्हणतोस काका?
२: हेलॊ, बोला काय म्हणताय!
१: सॉरी आरे, मला तुला दसर्याला फोन करायला नाही झाला… सगळी गडबड, गडबड चालु होती…
२: हंम्म…. विसरा आता तुम्ही अम्हाला… आता काय लग्न झाल्यावर, तुमच्याकडे आमच्या साठी कुठला वेळ आला आहे…
चालायचच…
१: तसं नाही रे काका…
२: आली पण नाहीस इकडे..
१: येईन येईन 🙂

………………………………………..

१: हेलॊ आत्या, गुड मॉरनिंग…
३: हेलॊ ताई, गुड मॉरनिंग, कशी आहेस?
१: मी छान, तु कशी आहेस? सॉरी ग, मला दसर्याला फोन करायला नाही झाला… गडबड चालु होती…
३: अग ठीक आहे, ताई, तुला फोन करायला नाही झाला, तसा मलाही तुला करायला जमलं नाही…
१: नाही ग… आत्या तुला उगाच वाटेल, विसरली की काय!
३: अग अम्हाला यात आनंदच आहे… पोरगी आता तिकडं इतकी रमली की तिला सारखी माहेरची आठवण येत नाही…  आता स्वत:च सगळं स्वत: बघती आहे! एखाद्या दिवशी एकडं येवून जा… विश्रांतीला. मी तुझ्यासाठी मस्त बेत करुन ठेवेन… मग तुळशी बागेत जावु दोघी मिळुन.
१: नक्की नक्की

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो… 
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते 

———

त्यांना कसे विचारू – कोठे पहाट गेली? 
त्यांच्यापल्याड त्यांची कोठेच धाव नाही.

——- 

कसा घ्यावा तुझ्यापाशी विसावा श्रांत चन्द्राने 
तुझ्या डोळ्यात स्वप्नांचा उभा वाडा चिरेबंदी!

——

कुठलेच फ़ुल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही

जमवूनही तुझ्याशी मझेतुझे जमेना
इतका तुझ्याप्रमाणे मी शोभीवंत नाही 🙂 🙂 My favourite  साफसाफ
——-

Reading  एल्गार! Awesome!

Here comes one more favourite,
प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला?  
ओळखीच्या माणसांचे ओळखीचे घाव होते?

कधी कधी वाटतं… आसंच तुझ्या कुशीत… गच्च डोळे मिटुन झोपुन राहावे… तु थोपटत राहवंस… तुझं ते कुठलं?… हां “कृष्णा कशी रे लागली, रक्ताची धार…” गाणं म्हणत राहवंस… भिंती पलीकडच्या झिरो बल्बचा प्रकाश…जागेपण आणि झोपेच्या मध्ये तरंगत रहावा आणि मग वेळ तिथेच थांबुन राहवा… कुठं म्हणजे कुठंच जावू नये.

कधी कधी वाटतं… असंच तुमची गोष्ट ऐकत… कुठल्याशा सोनेरी पेल्याची… त्याच्या शोधाची… खूप खूप मोठी गोष्ट… बाकी सगळे झोपुन गेले तरी मी ऐकत राहवं… आणि मग तुम्ही, तुमच्या स्टाईलमध्ये म्हणावं, “तर मग काय होतं….”,  न पेंगता, टक्क डोळ्यानी मी म्हणावं, “काय?” . हसत तुम्ही म्हणावं, “उद्या सांगेन!”… मग त्या गोष्टीच्या हीरो मागे मी स्वप्नात चालत राहवं… त्या उंच, उंच पाहडांतुन आणि मग स्वप्न कधीच तुटू नये…. तो सोनेरी पेला सापडे पर्यंत. 

कधी कधी वाटतं… मी असचं कितीतरी… ढीगभर बडबड करावी… साहीत्यावर, शास्त्राच्या आणि कश्या कश्याच्या गप्पा मराव्यात… आणि मग तु एक साधासा प्रश्न विचारुन झोपुन जावंस…. मी रात्रभर उगाचच भाजांळुन त्यावर विचार करत राहवा,  नवीनच लावलेल्या, रस्त्याच्या दिव्याच्या प्रकाशात न्हालेल्या, वरती हलणार्या शिंपल्यांच्या झुंबराकडे पहात… आणि मग उत्तर सापडुच नये. 

कधी कधी वाटतं…. त्या टिव्ही जवळच्या सोफ्यावर, तुझ्या पायावर पाय ठेवून, हातातल्या रिमोट बरोबर चाळा करत… रात्रभर पिक्चर पाहावेत… कुठला पिक्चर ठेवायचा आणि कुठला बद्लायचा हे एकमेकांना न सांगता कळांवं… रिमोट, कोणच्या हातात आहे, who cares, 4-5 वर volume ठेवुन… पाहात राहावं… त्या रंगीबेरंगी प्रकाशात स्वप्न आणि सत्य मिसळुन एक छान चित्र तयार व्हावं आणि मग त्याचे रंगगंध दरवळायचे कधी थांबुच नयेत.  

कधी कधी वाटतं… आजुनही कधीतरी पुन्हा एकदा… एकदाच! त्या गुरख्याच्या गाण्यानं जाग यावी… त्याचे शब्द समजु नयेत… अर्थ समजु नये… फक्त तो सुर पोहोचवा… आत खोलवर, जिथे आजवर खूप कमी गोष्टी पोहोचल्यात… क्षणभरच का होईना… मनाचा तळ लख्ख प्रकाशात उजळुन निघावा… आणि मग तो सुर कधी विसरताच येवु नये.

झोप झोप आणि झोप
सांडत आहे डोळ्यातुनी
सर्वत्र धुके वटते मज,
आंधरते हळूच, अन मग दिसेना कुणी.

दिस आज मज रात्री सम भासतो…
भासते सारी स्वप्न नगरी समीप
असोत कितिही ज्योती प्रदिप्त,
वाटे मालवु लागले आतुन दीप.

काय सांगु किर्ती तुझी मी
निद्रे तु तुझ्या सारखी ग,
आळवता न ये जवळी; येता समिप,
तुज पाश सोडवे न मग.

This poem is dedicated to all those who love their sleep, also to those who are experiencing Cubicle Effect right now and also to those who are suffering from Bipolar Disorder!

मला आवतार नाय आवडला…..
नाय आवडला तर नाय आवडला, किती का मग तो भारी आसेना…
मी चुकून म्हणजे चुऽकून तो पहिला २ डी पाहिला आन मग तो मला तितका नाय आवडला…
मग मी तो ३ डी पहिला तरी सुध्धा नाय आवडला! मला concept  नाय आवडली आसं नाय…पण कधी कधी eardrums वर आदळलेली गोष्ट डोक्यापर्यंत पोहोचेलच आसं काय नाही [माझ्यासमोर येवून आनेक लोक आनेकदा काही सांगतात पण there are times when it does not reach my mind or it is not registered. And till now I have not found exact reason for this absent-minded behaviour.]  तसं काहीसं झालं या movie च्या बाबतीत. आसो.

मला मग त्यापेक्षा ३ idiots आणि The Hangover खूप आवडले म्हणजे काही comparison नाही आहे पण theater बाहेर पडताना चांगलं वाटणे हे महत्वाचे. आणि somehow मला आवतार पाहून दोन्ही वेळेला थोडं थोडं कंटाळावणं वाटलं… का ते सांगू शकत नाही पण वाटलं.

पहील्यांदा पाहताना एक fantasy बद्दल कडीची आस्था नसलेला प्राणी बरोबर होता…. पण दुसर्यावेळी पण कमालीचं बोर होणे हे म्हणजे जरा जास्त होतं….  ठीक आहे. मला नाय आवडला आवतार. मला निळी माणसं पण नाय आवडली आणि ती निळी पोरगी सुळे दाखावत चार वेळा हिंस्त्र कींचाळते ते पण नाही आवडलं… पक्षी ठीक होते पण अरॅगॉन चे जास्त भारी होते. आणि आता बास. When people tell me how mesmerizing it was for them makes me feel even more dumb and shelled. I know they worked on it for 12 years and it was a great project but that is not changing my opinion about it. Lets agree to disagree. It’s not Human.

Invincible boredom

Riding on my bike,
alone, on a holiday,
in those vehicles and honking horns
when I stop at the signal
with red green lights
I think of my invincible boredom.

Walking in a park,
alone, on a Friday night
with those cheerful voices all around.
When I stare at a lovely fountain
from my favourite corner bench.
I think of my invincible boredom.

Wandering in a mall
alone, on a Saturday,
opening and closing those glass doors.
When I stop at a gift shop
to see those colourful wrappers
I think of my invincible boredom.

Sitting in a multiplex
alone, on a Sunday,
looking at posters and people.
when I stare at the chair, beside me,
just for no reason.
I think of my invincible boredom.

Surfing on the internet
in an internet cafe, everyday
playing nonsense games and passing time.
When I peep through the glass,
to see what the next person is doing,
I think of my invincible boredom.

 

End of war

Last battle before the end of war
and you wonder what you fought for

You have slain many
whom you thought your enemy.
you see their faces in dreams
and wake up with your own screams
But you think, you did your best
Now, you need some rest.
peace doesn’t come to you
you crave for it, and it dodges you.

Last battle before the end of war
and you wonder what you fought for…

eyes were closed, only ears were open
no thoughts, only orders were taken
mindless people, mind less tasks
no answers given, no questions were asked.
as this ends, you need to change everything
clink of medal, will bring nothing

Last battle before the end of war
and you wonder what you fought for…

you want to get back to the lane,
you used to live in…
heaps of debris wont let you in.
memories are vague and lost in time
and you don’t know from where to begin
in a new world, new time, you feel like reborn
and you have left very little to hope for

Last battle before the end of war
and you wonder what you fought for…

Next Page »