Office office


हरवणे, माझा छंद…
रमणे म्हणा हवंतर,
माझं लहानपण त्यातच गेलं, ह्या परी कथेमधुन त्या परी कथेमध्ये हरवण्यात.
सध्या आशी लोकं आयुष्यात आहेत की जी कधीच हरवत नाहीत, किंवा सगळावेळ दक्षतेनं राहतात की “हरवायाचं नाही”
I hope u understand…
अब्स्ट्राक्ट वाटण्याची शक्यता नाकरता येणार नाही, पण हे आसच आणि आगदी खरं आहे…
मग मी प्रयत्न करत आहे… नाही हरवायचं…. पण आपण हारवतोच.
थकणे हा प्रकार माझा जनरली फार लवकर होतो. मग आति कष्टाळु, जिद्दी, विचारी, कामाला वाहुन घेतेलेली लोकं बघितली की अ‍ॅटोमॅटीक स्वत:चा वैताग वैगेरे येतो. त्यांची चिकाटी, dedication, determination बघुनच मला दमायला होतं. माझी आई आशी आहे. पण तिचा हा सदगुण, तिच्या एका पोरानंही घेतला आसेल तर शप्पत!
कामासाठी आपण नसुन, आपल्या साठी काम आहे… आजवर माझी ही definition होती. आता ती बदलावी लगते की काय आसा प्रश्न आहे. निकराचा लढा चालु आहे स्वत:बरोबर. तसा तो नेहमीच चालु आसतो, पण ह्यावेळी मीच मझ्या बाजुने नाही आहे, आसं काहीतरी वाटत आहे.
अभ्यास मी पण केला आहे, चिकाटीनं, मानेचा काटा ढिला होई पर्यंत, पण office चं काम पण तितक्याच निष्ठेनं केल्याचं काही स्मरत नाही, काम करत नाही आसं नाही, जीव ओतुन, पण रोज नाही, हो! तसा अभ्यासही कुठे रोज करायचो?
मी आज आठ तास काम केलं असं कधी न चाचरता, अभिमानानं मग का म्हणता येत नाही, तर ह्या लोकांचं  dedication पाहिलं की आपण करतो ते कामच का? आसं वाटायला लागतं, न्युनगंड येतो.
पुर्वी आसे लोक नव्हते का आजुबाजुला? होते….. होते, पण ते इतके influential नव्हते. One more adaptation… going towards… one more new me. पण आसं किती दूर जाणार आहे मी? थकवा येतो आहे तो त्याचा… स्वत:पासुन दूर जाण्याचा… भिती वाटते ती ह्याची की लोकांकडुन चांगल्या-वाईट गोष्टी घेता घेता कधीतरी ओरिजिनल आपला काही अंशच राहणार नाही आपल्यात…
ओरिजिनल “मी” हेच जर मिथ्या मानलं तर मग गोष्टच वेगळी!

झोप झोप आणि झोप
सांडत आहे डोळ्यातुनी
सर्वत्र धुके वटते मज,
आंधरते हळूच, अन मग दिसेना कुणी.

दिस आज मज रात्री सम भासतो…
भासते सारी स्वप्न नगरी समीप
असोत कितिही ज्योती प्रदिप्त,
वाटे मालवु लागले आतुन दीप.

काय सांगु किर्ती तुझी मी
निद्रे तु तुझ्या सारखी ग,
आळवता न ये जवळी; येता समिप,
तुज पाश सोडवे न मग.

This poem is dedicated to all those who love their sleep, also to those who are experiencing Cubicle Effect right now and also to those who are suffering from Bipolar Disorder!

पिल्लु भिजत भिजत office ला पोहोचला, त्याला मशिन on होई पर्यंत दम नव्हता.
त्याने मोनाला बाजुला सरकवुन तिच्या मशिनवर notepad उघडले आणि सुरु झाला..
मोना :  हे काय?
पिल्लु : गाडीवर सुचलं [वळून स्वत:च्या मशीनचे start बटन दाबत…]

Delay(30000ms)
मोजुन तीन ओळी लिहल्या आसतील…

मोना : झालं चालु…
पिल्लु :  [पासवर्ड टाकत…] आरे माझं विसरून जाईल…

Delay(60000ms)
मोजुन एक ओळी लिहली आसेल… जरा विसराविसरी झाल्याने

मोना : झाला तुझा PC चालु…
पिल्लु : disturb नको करू राव… तु माझ्या सहित्य साधनेत व्यत्यय आणत आहेस
मोना : आणि तु माझ्या debug साधनेत साहित्याचा पाऊस पाडत आहेस!
 :०)

Eloquently [हे कवितेचे नाव आहे.]

Someday I want to become you
to sit in front of me
and see myself from your point of view
I don’t know what you are thinking now
I just want to know it somehow
I never know what comes next
when you raise your brow
and sit across the desk
I trust my intuitions for that
They tell me something has gone wrong
I need to know what is that
beginning of downfall
or just another game of cat and rat
If this has to end
lets get straight and cut the cord
to break a brittle thing is not so hard
stretching it, will bring the pain
Let this old chapter end.

आपण काय बोलतो आणि दुसरा काय ऐकतो याचा एकमेंकाशी काही संबंध नसुही शकतो.  जसं माझा TL जे बोलतो आणि मी जे ऐकते, किंवा कधी कधी मी जे बोलते आणि तो जे ऐकतो त्या दोन गोष्टींचा काही सुतराम संबंध नसतो.  I can prove this with following examples.

उदाहरणार्थ,

जेवून आपण पेंगत आसताना, कधी, कधी स्वगतही गावाला ऐकू जातील आश्या स्वरात बोलतो… आशीच दुपारच्या पेंगू वेळी 

मी : (आ‍ऽऽऽऽ[जांभई])  बारीक, बारीक भात खाल्ल्यामुळे  बहुतेक सुस्ती आली आहे…

हेमंत(Our Team Leader):  बारीक बारीक कसा खाशील, थोडा भात खाणार…

मी: (मी डोळे सुपारी एवढे मोठे करत…) काय?

हेमंत:  थोडा भात खाणार ना…

मी: oh…

हेमंत: तु काय ऐकलं?

मी: काय नाय…

आता सांगा आपण काय ऐकलं? ‘थोबाडात खाणार…’

तर हे आसं आहे.

 

 

आता दुसरा प्रूफ़,

हेमंत: तो फ़ोर्म कुठून ओपन होतो बरं…

मी: सेवच्या क्लिकवर…

हेमंत: काय? [Now he was in same condition as I was in earlier example.]

मी: सेवच्या क्लिकवर रे!

हेमंत: तु काय म्हणत आहेस?

मी: फ़ोर्म सेव बटणाच्या क्लिकवर ओपन होतो.

हेमंत: आसं होय.

मी: तु काय ऐकलं?

आता सांगा त्याने काय ऐकलं असेल? “शेव चकली चोर”  🙂

आसं एक आठ दिवसात एखादवेळा तरी घडतंच, म्हणून म्हणलं, आपण काय बोलतो आणि दुसरा काय ऐकतो याचा एकमेंकाशी काही संबंध नसुही शकतो. Interpretation ही तर आणखीनच वेगळी गोष्ट आहे!