मला आजुन आठवतय मला ताईनं सांगितलं की ” लोकसत्ता चांगला पेपर आहे”

मी नेहमीच्या स्टाईलने उडवुन लावलं “हुं! तुला तिकडच्या घारी राहुन, सगळ्या तिकडच्याच गोष्टी चांगल्या वाटतात…”

“तसं नाही दीदी, त्या चांगल्या आसतात म्हणुन चांगल्या वाटतात…”

आणि ते खरं आहे… तिनं अतिशय निष्पक्षपणे आपलं मत व्यक्त केलं होतं… ते समजयला मला पुढची चार वर्ष गेली!

आमच्याकडे म्हणजे काय… पुढारी, सकाळ, महासत्ता असे चमचमीत पेपर… वाचणार आम्ही विश्वसंचार आणि जाहिराती आणि गल्लीतल्या बातम्या… चविष्ट… दोष नाही देत आहे, सत्य परिस्थिती सांगत आहे… पेपर म्हणजे एवढंच वाटायचं… आणि बक्षीसाची कुपन्स!

आमच्याकडे डिस्ट्रीबुशनही फार चांगलं नव्हतं लोकसत्तेचं…

पुढं मग पुण्याला आल्यावर लोकसत्ता मिळायला लागला… आणि मग आवडायला लागला… इतका की आता कितीतरी वेळा मीही तईसारखा लोकांना आर्वजुन सांगाते “लोकसत्ता चांगला पेपर आहे. इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे पेपर चांगले आसतात…” आर्थात चांगुलपणालाही एक लिमिटेशन असतं. पण खरंच मला स्वत:ला लोकसत्ता आवडतो. बातम्या आसतात, नुसत्या जाहिराती नाही. विचार आसतात, उगाच वेडपट मतं नसतात… लिहणार्य़ाचा व्यासंग जाणवतो… भाषा चांगली आसते. अग्रलेख वाचयला मजा येते…  व्यांसंग, सारासर विचार करण्याची वृत्ती, सडेतोडपणा, आणि अलिकडं फार दुर्मिळ आसणारा आजोबांचा गोष्टीवेल्हाळपणा… सगळं सगळं मला भावतं. व्यक्तीवेध वाचताना खुप स्फुरण चढतं… पुस्तकाचं परीक्षण वाचताना, “वाचयला पाहीजे…” असं नक्की वाटतं कुठंतरी! कॉपीहि आसेल तर ती कुठुन करायची हे सुध्दा कळलं पाहीजेना!

बरीच चांगली लोकं लिहतात लोकसत्तामध्ये… गिरिश कुबेर यांचे लेख तर आर्वजुन वाचावे आसे माहितीपुर्ण आसतात. लोकरंगचे लेख, कथा बद्दलतर आसं खुपवेळा झालं आहे की, मी ताईला, नाहीतर ताईनं मला फोन करुन, “नक्की वाच!” असं सांगीतलं आहे. मग त्यावर चिक्कार चर्चा झोडलेली आहे.

लोकप्रभेचं ’मेतकुत’ तर माझं फार्फर आवडतं सदर होतं. मी मेतकुट कधी चुकवलं नाही!

आज सकाळी पेपर वाचुन झाल्यावर, रमाबाई रानडे यांच्यावरचा लेख वाचला लोकप्रभेत आणि खुप छान वाटला… इतका उत्साह वाटला की एकादमात हे सगळं लिहलं!

माझ्या लाडक्या पेपरसाठी! 🙂